Latest Posts

महिला व बाल विकास विभागाने थांबविले अवैध दत्तक विधान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे एका कुमारी मातेने एका बालकास जन्म दिला असता सदर बालकास अवैधरित्या दत्तक देण्याचे बालिकेच्या आईवडीलांनी ठरविले आहे. अशी माहिती सखी वन स्टॅाप सेंटरच्या केंद्र प्रशासक रेश्मा रघाटाटे व केस वर्कर शारदा कुमरे यांना प्राप्त  होताच त्यांनी सामान्य रुग्णालयास भेट देऊन बाळाच्या आईवडीलांशी चर्चा करुन सदर बाळ कोणत्याही परकीय व्यक्तीस देता येत नाही  बाळ देणे हे कायदेशिर रित्या गुन्हा आहे. असे समजावुन जांगून अवैध दत्तक विधान थांबविण्यात आले. असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा कुरसंगे यांनी सांगितले.

जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा येथे एका कुमारी मातेने एका बालकास जन्म दिला असता सदर बालकास अवैधरित्या दत्तक देण्याचे बालिकेच्या आईवडीलांनी ठरविले होते. अशी माहिती सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक रेश्मा रघाटाटे व केस वर्कर शारदा कुमरे यांना प्राप्त झाली असता सदर बाबीं संदर्भात रुग्णालयात भेट दिली. यावेळी बालिकेच्या आईवडीलांशी चर्चा केली असता सदर बाळ हे आम्ही ठेवणार नाही व बाळाला आम्ही नातेवाईकांकडे देत आहोत अशी माहिती मिळाली. बाळाच्या आईवडीलांनी दिली.

नातेवाईकांशी सविस्तर चर्चा केली असता नातेवाईक नसुन ओळखीचे आहे. असे सखी वनस्टॅाप सेंटरच्या लक्षात आले. यासंदर्भात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महेश कामडी यांना माहिती देण्यात आली. यावेळी समुपदेशक आरती नरांजे, जिल्हा समन्वयक, आशिष मोडक, चाईल्ड लाईन यांच्यासह घटनास्थळावर भेट देऊन बालिकेच्या आईवडीलांशी व नातेवाईकांशी सविस्तर चर्चा केली. आपण सदर बाळ हे कोणत्याही परकीय व्यक्तीला देवुन शकत नाही अशा पध्दतीने बाळ देणे हे कायदेशीर रित्या गुन्हा आहे व असे केल्यास बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलम ८० व ८१ नुसार कार्यवाही करण्यात येते असे सांगण्यात आले. यासोबत कोणत्याही दत्तक इच्छुक पालकाला बाळ दत्तक घ्यायचे असल्यास कारा दत्तक ग्रहण प्रणालीच्या कायदेशीर प्रक्रियेनुसार नातेसंबंधातील किंवा संस्थाअंगतर्गत दत्तक विधान करावे अशी पालकांना समज दिली. सदर बाळ हे पालक व कुमारी माता सांभाळण्यास इच्छुक नसल्याने सदर बाळ हे बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये विशेष दत्तक संस्थेमध्ये दाखल करण्यात आले.

नागरीकांनी कोणत्याही अवैद्य पध्दतीने दत्तक विधान करु नये. दत्तक विधान करावयाचे असल्यास www.cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर जावुन रजिस्टेशन करुनच दत्तक विधानाची प्रक्रिया करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा कुरसंगे यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss