विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : तालुक्यातील विसापूर गावाची जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन, देशातील २९ वी आधुनिक रक्षा मंत्र्यालया अंतर्गत येणारी सैनिक शाळा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे तालुका क्रीडा संकुल अशा विविध बाबीमुळे जगाच्या नकाशात नोंद झाली आहे. अशा गावात एकही जलद बस थांबत नाही ही मोठी शोकांतिका आहे. नाममात्र जलद बस थांबा येथे एस टी महामंडळाने दिले आहे पण एकही बस थांबत नाही. या बाबत यंग चांदा ब्रिगेड शाखा विसापूर अध्यक्ष बळी नरुले व सामाजिक कार्यकर्ता राजू लांडगे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्फत एस टी महामंडळ ला निवेदन देऊन विसापुर फाट्यावर बस थांबविण्याची मागणी केली.
महामंडळाने सकारात्मकता दाखवत त्या संदर्भातील प्रत इतर सर्व बस विभागला गुरूवार १४ मार्चला दिल्यामुळे अशा पल्लवित झाल्या आहे. परंतु या आदींचे आंदोलन बघता प्रत्यक्ष बस थांबली तरच खरे वाटेल.
विसापूर फाट्यावर जलद बस थांबा मिळावा म्हणून या पूर्वी अनेक आंदोलन विसापुरतील नागरिकांनी केले त्याची फलश्रुती म्हणून काही दिवस बसेस थांबाल्या सुद्धा परंतु तो आनंद दीर्घ काळ टिकला नाही आज स्थितीत जलद बसेस थांबने बंद झाले असून जलद थांबा फलक अडगळीत पडलेल्या अवस्थेत आहे. आज घडीला गावाची जवळ पास १७ हजार लोक संख्या आहे अनेक नागरिकांना शासकीय कामांसाठी व इतर कामासाठी मोठ्या शहरात जावे लागते शिवाय बॉटनिकल गार्डन मुळे पर्यटकांची वर्दळ वाढली आहे पण एकही जलद गतीची बस येथे थांबत नसल्यामुळे त्यांना सरळ बल्लारपूर बस स्थांनक गाठावे लागते ते आता एस टी महामंडळची जलदबस विसापूर फाट्यावर थांबल्यास बंद होणार.
