विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : जिल्हयातील सुशिक्षित बेराजगार युवक व युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उददेशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जुलै २०२४ ला सकाळी १०.०० ते दु. २.०० या वेळेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्या सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात रिक्तपदे भरण्यात येणार असून जिल्हायातील इच्छुक व गरजू सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या मेळाव्यामध्ये मुलाखत व तत्सम प्रक्रीयेद्वारा उमेदवारांची निवड होणार असल्याने उमेदवारांनी स्वखर्चाने मेळाव्याच्या दिवशी व वेळेत शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती व पासपोर्ट फोटोसह मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे. युवक व युवतींनी सदर रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www. mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर ऑनलाईन अप्लाय करावा. महास्वयंम पोर्टलवर ऑनलाईन अर्ज होत नसल्यास खालील लिंक ओपन करून गुगलफॉर्म भरुन अर्ज करावा किंवा क्यू आर कोड स्कॅन करून गुगल फॉर्मद्वारे ऑनलाईन अर्ज करावा.
सदर मेळाव्याचा जिल्हयातील अधिकाधीक गरजू युवक व युवतींनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त सुधाकर झळके जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांनी केले आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या ०७१८४-२५२२५० या दुरध्वनी क्रमांकावर किंवा श.क.सय्यद मो.क्र. ७६२०३७८९२४ यांचेशी संपर्क साधावा.
