विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : २०२४ चा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना आपल्यासोबत थंडी घेऊन येत आहे. वाढत्या थंडीमुळे महिनाभरात शाळा-महाविद्यालयांना अनेक सुट्या लागण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याबद्दल बोलायचे झाले तर, विद्यार्थी असोत की नोकरदार सर्वांनी अनेक सुट्ट्यांचा आनंद लुटला. नोव्हेंबरमध्ये भाऊबीज, दिवाळी यांसारख्या सणांमुळे अनेक सरकारी सुट्ट्या होत्या. नोव्हेंबर पाठोपाठ डिसेंबरमध्ये देखील खूप सुट्ट्या आहेत. विद्यार्थ्यांसोबतच पालकांना देखील आराम मिळेल.
तुम्ही विद्यार्थी असाल, बँकेत काम करत असाल किंवा सरकारी कर्मचारी असाल तर डिसेंबर महिन्यात तुम्हाला किती सुट्या मिळणार आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वास्तविक डिसेंबरमध्ये फार मोठे सण नसले तरी विशेष दिवसांमुळे सुट्ट्या असतील. म्हणजेच या काळात शाळा, महाविद्यालये आणि बँका बंद राहतील.
डिसेंबरमध्ये किती दिवस शाळा बंद राहतील?
डिसेंबर महिन्यात जवळपास ६ दिवस शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये रविवारचाही समावेश आहे.
शाळा कॉलेजमध्ये दिवस राहिल बंद –
१ डिसेंबर रविवार
६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन
८ डिसेंबर रविवार
१५ डिसेंबर रविवार
२२ डिसेंबर रविवार
२५ डिसेंबर रविवार
२९ डिसेंबर रविवार
२५ डिसेंबर रोजी सुट्टी –
डिसेंबर महिन्यात नाताळच्या निमित्ताने शाळांना सुट्टी असेल. या दिवशी देशभरातील शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि बँका बंद राहतील. या सुट्यांव्यतिरिक्त डिसेंबरमध्ये हिवाळ्याच्या सुट्ट्याही मिळतात. याशिवाय रविवारी सर्व शाळा बंद असतात. अनेक शाळांमध्ये शनिवारीही वर्ग नाहीत. डिसेंबर महिन्यात पाच रविवार आणि चार शनिवार येतात. या दिवशी शाळांना सुटीही असणार आहे.
बँका कधी बंद राहणार?
डिसेंबर महिन्यात एकूण १७ दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. डिसेंबरमध्ये सुट्ट्या कधी असतील ते जाणून घ्या.
१ डिसेंबर २०२४ – रविवार
६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन
८ डिसेंबर २०२४ – रविवार
१४ डिसेंबर २०२४ – दुसरा शनिवार
१५ डिसेंबर २०२४ – रविवार
२२ डिसेंबर २०२४ – रविवार
२४ डिसेंबर २०२४ – हुतात्मा दिवस/ख्रिसमस पूर्वसंध्येला
२५ डिसेंबर २०२४ – ख्रिसमस (देशभर बँक सुट्टी)
२६ डिसेंबर २०२४ – बॉक्सिंग डे आणि क्वांझा (सर्व बँका बंद राहतील)
२८ डिसेंबर २०२४ – चौथा शनिवार
२९ डिसेंबर २०२४ – रविवार
३० डिसेंबर २०२४ – सोमवार, तमू लोसार
३१ डिसेंबर २०२४ – नवीन वर्षाची पूर्वसंध्या
