Latest Posts

नवले पूल; पुण्यातील मृत्यूचा सापळा : प्रशासनाची दुर्लक्ष आणि अपघातांची मालिका

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / पुणे (Pune): नवले पूल हे पुणेकरांसाठी आता मृत्यूचे सापळा बनले आहे. गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला, पण हे अपघाताची पहिलीच घटना नाही. गेल्या १३ वर्षांत या पुलावर ४७ अपघात झाले आहेत, ज्यात ६८ जणांचा बळी गेला आहे. यावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आणि निष्काळजीपणं गंभीर प्रश्न निर्माण करत आहे.

नवले पूल परिसरातील ब्लॅक स्पॉटचा इतिहास २०१२ पासून सुरू झाला, जेव्हा स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या रचनेतील दोष, वळणाचा तीव्रपणा, दिशादर्शक फलकांचा अभाव, लेन मार्किंगची अस्पष्टता आणि प्रकाशयोजनाच्या अपुरीतेबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर प्रशासनाने लवकर दुरुस्ती करू असं आश्वासन दिलं, पण प्रत्यक्षात काहीही घडलं नाही. २०१८ मध्ये इथेच ५ जणांचा मृत्यू झाल्यानंतरही समस्या जसाच्या तशा राहिल्या.

२०२० मध्ये आयआयटी मुंबईच्या अभियंत्यांनी ३२ अंशांच्या वळणावर तक्रार केली, तर २०२३ मध्ये उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले. चौकशीमध्ये दोषी ठेकेदारावर कारवाई न करता त्याला दुसऱ्या पुलाच्या कंत्राटाचा पुरस्कार करण्यात आला.

२०१२ ते २०२५ या काळात नवले पुलावर ४७ गंभीर अपघात झाले आहेत, ज्यात ६८ मृत्यू आणि १२४ जखमी झाले आहेत. ३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, आणि ४१ जनहित याचिकाही प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. तसेच, १८ कोटी रुपयांची सुरक्षा उपायांची रक्कम मंजूर केली गेली, पण त्यापैकी केवळ २.३ कोटी रुपये फलक आणि रंगांवर खर्च केले गेले.

२०१९ मध्ये केंद्र सरकारने नवले पुलाला हाय रिस्क झोन म्हणून घोषित केले. तथापि, गती मर्यादा ४० किमी/तास ठेवून देखील वाहनं ८०-९० किमी/तास गतीने धावतात, आणि पोलिस प्रशासन मात्र डोळे झाकून बसले आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नवले पूल पुणेकरांसाठी एक घातक ठिकाण बनला आहे, आणि यावर तात्काळ कारवाईची आवश्यकता आहे.

Latest Posts

Don't Miss