Latest Posts

बाप व लेकाने कुऱ्हाडीने केली हत्या : मुल तालुक्यातील हळदी येथील घटना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (२१) : जिल्ह्यातील मुल तालुक्यातील हळदी गावात किरकोळ वादातून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

माहितीनुसार, शनिवारी ७ जुलै रोजी सकाळी १० वाजता हळदी गावात बाप गुरुदास पिपरे (४८) आणि लेक सूरज गुरुदास पिपरे (२१) हे घरातील झाडे तोडत होते. दरम्यान, शेजारी राहणारे राजू शेषराव बोदलकर (३०) यांनी झाड तोडताना सूरज व गुरुदास यांना तार वाचवण्यास सांगितले. इतके आयकताच समजताच मुलगा सूरज व वडील गुरुदास यांनी राजू बोदलकर यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात राजूचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सूरज आणि गुरुदास यांना अटक केले आहे.

Latest Posts

Don't Miss