विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : या शैक्षणिक वर्षासाठी डी.एल.एड प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने होत आहे. पाजावतचे वेळापत्रक ऑनलाईन अर्ज भरण्याच्या सविस्तर सूचना प्रथम वर्ष प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयाची पादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे www.maa.ac.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
शासकीय कोट्यातील प्रवेशासाठी ०१ ते ०५ ऑगस्ट, २०२४ कालावधित www.maa.ac.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना भरता येतील. अर्ज भरण्यासाठी उमेदवाराचा स्वतःचा Email ID असणे बंधनकारक आहे. प्रवेश अर्ज शुल्क खुला संवर्ग रूपये २ हजार खुला संवर्ग वगळून अन्य मागास संवर्गासाठी रूपये १०० असे राहील.
उमेदवारास एकापेक्षा जास्त माध्यमासाठी अर्ज करावयाचा असेल तर प्रत्येक माध्यमाच्या संवर्गानुमार स्वतंत्र आवेदनपत्र व शुल्क भरावे लागेल. प्रवेश अर्ज शुल्क स्विकारण्याची पध्दती प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन Payment gateway E-Wallet स्वतःचे किंवा नातेवाईकाचे क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड याद्वारे स्विकारले जातील.
प्रवेश पात्रता प्रवेशास इच्छुक असणारे कला, वाणिज्य, विज्ञान व एम.सी.जी.सी. शाखेतील पात्र उमेदवार इयत्ता बारावी खुल्या संवर्गासाठी किमान ४९.५० टक्के गुण व खुला संवर्ग वगळून अन्य संवर्गासाठी किमान ४४.५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.व्यवस्थापन कोटयातुन प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेतील अर्ज भरणे बंधनकारक आहे.
उमेदवारांना प्रवेश अर्ज भरतांना तांत्रिक अडचणी असल्यास अशा अडचणी स्वत:च्या registered Email वरून Support deledadmission या Email वर पाठवाव्यात, या विशेष फेरीमधून इ.१२ वी उत्तीर्ण झालेले व नव्याने प्रवेश अर्ज भरण्यास इच्छुक असलेले उमेदवार, नियमित डी.एल.एड प्रवेश प्रक्रीयेत ऑनलाईन अर्ज पूर्ण न भरलेले, submit/approve न केलेले विद्यार्थी, दुरुस्ती (Correction) न केलेले विद्यार्थी ऑनालाईन प्रवेश फेरीमधून प्रवेश न घेतलेले विद्यार्थी भाग घेऊ शकतील.
ज्या विद्यार्थ्यांना नियमित प्रवेश प्रक्रीयेमध्ये अध्यापक विद्यालय मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांनी आपले पसंतीक्रम बदलून द्यावेत, ज्या अध्यापक विद्यालयात जागा रिक्त आहे त्या अध्यापक विद्यालयाचा पसंतीक्रम ज्या विद्यार्थ्यांनी यापुर्वी डी.एल.एड ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेत प्रवेशासाठी ऑनलाईन शुल्क भरले आहे. त्यांनी संधी प्रवेश फेरीसाठी नव्याने शुल्क भरण्याची आवश्यकता नाही, परंतु त्यासाठी जो ई-मेल आय डी व मोबाईल क्रमांक रजिस्टर केला आहे तोच ई-मेल आय डी व मोबाईल क्रमांक वापरणे गरजेचे आहे. प्रवेशाबाबतचे वेळापत्रक संकेत स्थळावर प्रसिध्द केले जाईल.
असे प्राचार्य रत्तनप्रभा भालेराव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, भंडारायांनी कळविले आहे.
