Latest Posts

चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोवा ठरली मिस वर्ल्ड

– भारताच्या सिनी शेट्टीला अश्रू अनावर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : मिस वर्ल्ड 2024 चे तब्बल २८ वर्षांनंतर भारतात आयोजन करण्यात आले होते. चेक रिपब्लिकच्या क्रिस्टीना पिस्कोवा ‘मिस वर्ल्ड’ ठरली. यासोबत लेबनानची यास्मीन जेटून पहिली रनर अप ठरली.

भारताची सिनी शेट्टी (Sini Shetty) टॉप 4 च्या शर्यतीतून बाहेर पडली. काल 9 मार्च 2024 रोजी मिस वर्ल्ड ग्रँड फिनालेचं आयोजन मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर येथे करण्यात आले होते.

सिनी शेट्टीला अश्रू अनावर :
मिस इंडिया 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी सिनी शेट्टी टॉप 8 पर्यंत पोहोचू शकली. यानंतर टॉप 4 च्या शर्यतीतून ती बाहेर पडली. मिस वर्ल्ड स्पर्धा संपल्यानंतर तिचा अश्रू अनावर झाल्याचे एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. बाहेरर आल्यानंतर सिनीने सर्वांची भेट घेतली. यावेळी तिला अश्रू अनावर झाले. तरी तिने चेहऱ्यावरील हास्य कायम ठेवलं. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Latest Posts

Don't Miss