विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या राज्य शासनाच्या महत्वकांक्षी योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व गतीमान करण्यासाठी संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून लाभार्थ्यांनी संकेस्थळावर अर्ज भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
ज्या लाभार्थ्यांनी नारी शक्तीदूत ॲप वर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या संकेस्थळावर अर्ज भरण्याची गरज नाही. ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही अर्ज केला नाही. त्यांनी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर क्रियेट अकांऊटवर क्लिक करुन अर्ज भरावेत. ज्यांना स्वत: अर्ज भरणे जमणार नाही, त्यांनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, (नागरी, ग्रामीण, आदिवासी), ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्र, आशा वर्कर, बचतगटाचे समुह साधन व्यक्ती या शासनाच्या अधिकृत प्रतिनिधी किंवा केंद्रावरून अर्ज भरावे. अर्ज भरण्याची प्रक्रिया मोफत आहे.
जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी २ ऑगस्ट पर्यंत १ लाख ९९ हजार ९१४ महिलांनी अर्ज केले असून त्यामध्ये वर्धा तालुक्यातील ४७ हजार ६२, सेलू तालुक्यातील २२ हजार ८३६, देवळी तालुक्यातील २३ हजार ४१४, समुद्रपूर तालुक्यातील २० हजार ६३६, हिंगणघाट तालुक्यातील ३६ हजार ४५४, आर्वी तालुक्यातील २२ हजार ३७०, आष्टी तालुक्यातील ११ हजार ७३५ व कारंजा तालुक्यातील १५ हजार ४०७ महिलांनी अर्ज केले आहेत.
