विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : राज्यातील युवक / युवतींना स्वयंरोजगार प्राप्त होण्याचे दृष्टिने उद्योग स्थापन करण्याकरीता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम CMEGP राबविण्यात येत असून त्या अंतर्गत उत्पादन, सेवा करीता ५० लक्ष तर सेवा क्षेत्राकरिता २० लक्ष पर्यंत कर्जाची प्रकल्प किमत मर्यादा आहे, मंजूर केलेल्या कर्जावर शहरी / ग्रामिण तसेच प्रवर्गात १५% ते ३५% मार्जिन मनी दिली जाते. ही योजना ऑन लाईन असून maha-cmegp.gov.in या पोर्टलवर अर्ज करता येता. वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षे असून, महिला, अपंग, माजी सैनिक व मागास वर्ग नुसार ५ वर्षे शिथीलक्षम आहे.
सन २०२४-२५ करिता भंडारा जिल्हयास ६०० प्रकरणांचे उद्यिष्ट आहे, आतापर्यंत ५०२ प्रकरणे बँकेस सादर करण्यात आली असून ३९ प्रकरणे मंजूर झाली. असल्याचे जिल्हा व्यवस्थापक हेमंत बदर यांनी कळवले आहे.
