Latest Posts

नागरिकांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घ्या : जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

– जिल्हाधिकाऱ्यांची नियंत्रण कक्षाला भेट

विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha): जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता व अन्य विषयासंबंधी प्राप्त होणाऱ्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाला जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्यासह भेट दिली. यावेळी त्यांनी अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. त्याचप्रमाणे चारही विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनील गावीत यांच्यासह नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी  जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हयातील मतदार व सर्वसामान्य नागरीकासाठी माहितीची देवाणघेवाण सुलभ होण्याच्या दृष्टीने आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान सामान्य जनतेच्या निवडणुकीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरावर आणि जिल्ह्यातील वर्धा, आर्वी, देवळी हिंगणघाट या चारही मतदार संघाचे ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

नागरिकांना निवडणूक विभागाकडील निवडणूक विभागाशी संबधीत समस्यांचे निराकरण तसेच आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होत असल्यास व इतर तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्षात दुरध्वनी १९५० हा टोल फ्रि क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच एनजीएसपी व सिव्हिजिल या ऑनलाईन पोर्टलव्दारे सुध्दा तक्रारीचे निवारण करण्यात येत आहे.

नियंत्रण कक्षातील दुरध्वनी १९५० टोल फ्रि क्रमांक निवडणुकीच्या काळात २४ x ७कार्यरत आहेत. जिल्‍हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज सोमवार ला  नियंत्रण कक्षात भेट दिली तसेच कक्षात उपस्थित कार्यरत कर्मचा-यांशी संवाद साधला.

Latest Posts

Don't Miss