Latest Posts

चिंतामणी विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpu) : चिंतामणी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विसापूर येथे शुक्रवार ३० ऑगस्टला आपत्ती  व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होते.

सदर कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा चे विभाग प्रमुख तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली प्रमाणित आपत्ती व्यवस्थापन तज्ञ प्रा. ओमप्रकाश सोनोने यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापना बाबत माहिती दिली व असे प्रसंग आल्यास कशा पद्धतीने हाताळावे याचे प्रात्यक्षिक करून दाखवीले यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः ते प्रात्यक्षिक करून आपत्ती व्यवस्थापनाची धडे गिरवले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य प्रशांत दोंतुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदर कार्यशाळेत प्रा. ओमप्रकाश सोनोने यांनी आग, महापूर, भूकंप, भूस्खलन या सारख्या वेळी आपत्ती व्यवस्थापन कसे करावे याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. एखादा व्यक्ती पाण्यात बुडत असताना त्याला कसे वाचवावे, एखाद्या इमारती मध्ये आग लागली तर कोण कोणत्या उपाययोजना कराव्या याची माहिती व प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच गॅस सिलेंडरला आग लागल्यास काय करावे याची प्रात्यक्षिक करून दाखविले. आग लागल्यास अग्निशमन यंत्राचा वापर कसा करावा, सावधानी कशी बाळगावी याचे हे प्रात्यक्षिकाद्वारे करून दाखविले व विद्यार्थ्यांन कडून स्वतः प्रात्यक्षिक करून घेतले. यामुळे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन हाताळण्याबाबत आत्मविश्वास वाढला व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणात हिरहिरीने भाग घेतला आणि आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गिरवून घेतले होते.

कार्यक्रमाचे संचालन सहा. शिक्षिका सोनाली आत्राम तर आभार प्रदर्शन विकास कल्लूरवार ने केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहा. शिक्षक अरुण टोंगे, शुभांगी बरडे, गौतमी खोब्रागडे, संतोषी तगलपल्लेवार, श्रद्धा साखरकर, मुन्ना पुंडे, रवी कोडापे यांनी मोलाचे सहकार्य लाभले होते.

Latest Posts

Don't Miss