Latest Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जात आहे. पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून  कौशल्य व आत्मविश्वास विकसीत व्हावा यादृष्टीने ही योजना महत्वपूर्ण आहे. याचबरोबर उद्योजकांना लागणारे कुशल मनुष्यबळ या योजनेद्वारे  घडविता येईल. पात्र उमेदवारांनी या संधीचा  जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले.

ही कार्य प्रशिक्षण योजना ६ महिन्यासाठी असूनया रितसर नोंदणी करुन रुजू झालेल्या बारावी पास उमेदवारांना ६ हजार रुपये, आयटीआय/पदविका उमेदवारांना ८ हजार रुपये तर पदविधर व पदव्युत्तर उमेदवारांना १० हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन देण्यात येईल. बारावी, आय. टी. आय. पदविका, पदवीधर व पदव्युत्तर झालेल्या उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर जावून आपल्या लॉगिन आयडी पासवर्ड च्या माध्यमातून पोर्टलवर CMYKPY अंतर्गत नोंदविलेल्या विविध रिक्तपदांना ऑनलाईन अर्ज करावेत.

Latest Posts

Don't Miss