Latest Posts

चंद्रपुरात दारूच्या नशेत सख्ख्या भावाने कुऱ्हाडीने केली भावाची हत्या

विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : चंद्रपूर येथील आरटीओ कार्यालयाच्या मागे सख्ख्या भावाने भावाची हत्या केल्याची घटना काल रात्री ७ वाजता घडली. आरटीओ कार्यालयाच्या मागे उडिया मोहल्ला येथे राहणारे गणेश गेडाम यांची सख्ख्या भावाने कुऱ्हाडीने वार करीत हत्या केली.

७ ऑगस्ट ला रात्री १० वाजता गणेश पुंडलिक गेडाम हा घरी जेवण करीत होता. त्यावेळी त्याचा भाऊ मंगल पुंडलिक गेडाम घरी आला. तो दारू च्या नशेत होता, त्याने भावाला शिवीगाळ करीत वाद सुरु केला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले, त्यानंतर तिथे ठेवलेली कुऱ्हाडीने गणेश च्या गळा व डोक्यावर वार केला. या हल्ल्यात गणेश जमिनीवर कोसळला, रक्तबंबाळ अवस्थेत वार्डातील रहिवाश्यांनी गणेश ला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेत असताना वाटेत गणेश यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ आरोपी मंगल गेडाम ला अटक केली. उत्तरीय तपासणीसाठी गणेश चा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

Latest Posts

Don't Miss