Latest Posts

चंद्रपूर शहरात वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या महिलेवर कारवाई : ०४ पिडीत महिलांची सुटका

– स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांची कार्यवाही

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी/चंद्रपूर (Chandrapur) : चंद्रपूर शहरात स्वतःचा घरी वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या महिलेवर २६ ऑक्टोबर ला स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत ०४ पिडीत महिलांची सुटका केली.

२६ ऑक्टोबर ला विधानसभा निवडणुक – २०२४ चे आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने चंद्रपुर जिल्हयात दारूबंदी, जुगार प्रनियम प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु तसेच इतर अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता पोलीस स्टेशन रामनगर परिसरात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, तैबुल फातिमा अब्दुल रफीक शेख, रा. जुनोना चौक, चंद्रपूर ही स्वतःच्या राहते घरी महिलाकडून वेश्याव्यवसाय करीत आहे, अशी खात्रीशीर खबर मिळाल्याने स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अन्वये विशेष पोलीस अधिकारी महेश कोंडावार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, पोउपनि संतोष निंभोरकर, महिला व पुरूष अंमलदार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी समाजसेविका श्रीमती सरिता राजेद्र मालु रा. चंद्रपूर,  बनावट गि-हाईक, पंचासह छापा टाकुन दलाल महिला आरोपी तैबुल फातिमा अब्दुल रफीक शेख, रा. जुनोना चौक, चंद्रपूर यांचेवर कायदेशीर कारवाई केली.

तसेच ४ पिडीत महिलाची सुटका करून त्यांना स्वधारगृह येथे दाखल करण्यात आले. पोउपनि संतोष निंभोरकर यांनी दिलेल्या रिपोर्टनरून पोलीस स्टेशन रामनगर येथे कलम ३.४.५ स्त्रिया व मुलौ अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन रामनगर हे करीत आहे.

सदरची कार्यवाही सुदर्शन मुम्मका पोलीस अधिक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, सुधाकर यादव उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात विशेष पोलीस अधिकारी  महेश कोंडावार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, पोउपनि संतोष निंभोरकर, पोहवा चेतन गज्जलवार, पोहवा नितेश महात्मे, पोअं किशोर वाकाटे, पोअं अमोल सावे, पोअं प्रफुल गारघाटे, पोअं प्रमोद कोटनाके, चालक मिलिंद टेकाम, महिला अंमलदार उषा लेडांगे, अर्पणा मानकर, छाया निकोडे, टिपीका सोडणार सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी कारवाई केली आहे.

Latest Posts

Don't Miss