विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर(Chandrapur) : कलकत्त्याच्या आर जी कॉलेजमध्ये झालेला बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे शेकडो डॉक्टर्स आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले.
९ ऑगस्ट रोजी कलकत्त्याच्या आर जी कार मेडिकल कॉलेज येथे एका निवासी महिला डॉक्टरचा बलात्कार करून तिची नृशंस हत्या करण्यात आली. त्या प्रकरणाच्या तपासामध्ये खूप अनियमितता आढळून येत आहे आणि प्रशासनाकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप करीत डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने आणि पीडित परिवाराने केलेला आहे. या निर्घुन प्रकाराचे पडसाद देशभरामध्ये दिसून येत आहेत आणि देशभरा मधील मेडिकल कॉलेजेस चे निवासी डॉक्टर्स आणि विद्यार्थी या विरोधामध्ये संतप्त निदर्शने करीत आहेत आणि संपावर सुद्धा गेलेले आहेत. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षापासून एरणीवर आलेला आहे. पण सरकारकडून आणि प्रशासनाकडून या बाबतीमध्ये कुठलेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. निवासी डॉक्टरांच्या कामांच्या तासांबाबत असो अपुऱ्या स्टाफ अभावी असो निवासी डॉक्टरांना मोठ्या प्रमाणावर याचा त्रास सहन करावा लागत आहे. दोषींना लवकरात लवकर फास्टट्रॅक न्यायालयामध्ये खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात यावी, तसेच डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा कायदा कठोरपणे अमलात आणल्या जावे.
या मागणीसाठी आज शेकडोंच्या संख्येने चंद्रपूर येथील निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनी बेटी बचाव आणि बेटी पढाव चा नारा देणाऱ्या सरकारच्या राज्यामध्ये बेटीवरील अन्याय अत्याचार आजही थांबलेले नाहीत जर दोषींना लवकरात लवकर शिक्षा झाली नाही तर देशभरामध्ये आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी डॉक्टरांनी दिला.
सदर डॉक्टरांचा मोर्चा मेडिकल कॉलेज रामनगर, जटपुरा गेट, गिरनार चौक, गांधी चौक पासून जनरल हॉस्पिटल चंद्रपूर पर्यंत करण्यात काढण्यात आला होता.
यावेळी मार्ड असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अक्षय वाघमारे, चंद्रपूर कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे चंद्रपूर येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ. राकेश गावतुरे, आयएमए चे अध्यक्ष डॉ. संजय घाटे, प्रसिद्ध मानसिक रोग तज्ञ डॉ. विवेक बांबोडे, डॉ. प्रीती बांबोडे, डॉ. राम भारत, डॉ. पल्लवी डोंगरे डॉ. अनुप पालीवाल, डॉ.प्रीती उराडे, डॉ. विद्या राणे, डॉ. समृद्धी वासनिक डॉ. सुमेद राणावत, डॉ. प्रणय गांधी आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे शेकडो डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले होते.
