Latest Posts

गडचिरोली पोलीस दलातर्फे एक तास स्वच्छतेसाठी उपक्रमाचे आयोजन

– बाईक रैलीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सारथ्य ३०० अंमलदारांचा सहभाग
– जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोस्टे/उपपोस्टे व पोमकें स्तरावर सुद्धा केले आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारतर्फे चालविले जाणारे सर्वात महत्वाचे अभियान आहे. याचाच एक भाग म्हणून स्वच्छता हि सेवा या मोहीमे अंतर्गत एक तारिख एक घंटा या उपक्रमाच्या अनुषंगाने महचिरोली पोलीस दलातर्फे आज ०१ ओक्टोम्बर २०२३ रोजी सकाळी ७.०० ते ८.०० वा. पर्यंत पोलीस मुख्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोस्ट/ उपपोस्टे/ पोमकें येथे एक तास स्वच्छतेसाठी उपक्रमाचे व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.

सदर स्वच्छता उपक्रम हे पोलीस अधीक्षक कार्यालय, शौर्यस्थळ, पोलीस संकुल परिसर, पोलीस कॅन्टीन, सीआरपीएफ परिसर, पोलीस मुख्यालय परिसरातील जेटीएससी, एकलव्य हॉल, पोलीस कवायत मैदान, शहिद पांडू आलाम सभागृह इ. परिसरात तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोस्ट्रे/उपपोस्टे/पोमकें परिसरात साफसफाई करुन राबविण्यात आले. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षरित्या सहभाग घेऊन पोलीस अंमलदारांसोबत मिळून पोलीस मुख्यालय परिसरात स्वच्छता केली. तसेच सुंदर स्वच्छता उपक्रमाचे महत्व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी गडचिरोली पोलीस दलातर्फे पोलीस कवायत मैदान ते इंदिरा गांधी चौक पर्यंत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये एकुण ३०० पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला. तसेच जिल्ह्यातील जनसामान्य जनतेने या स्वच्छता उपक्रमात आपला सहभाग नोंदवून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

सदर कार्यक्रम प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून सांगीतले व आपल्या सभोवताल स्वच्छता राखणे ही आपली नातीक जबाबदारी आहे. तसेच आपले शरीर निरोगी राहावे व आपल्या आजुबाजुच्या परिसरात रोगराई निर्माण न होऊ देता प्रत्येकजणांनी आपले घर व घराच्या आजुबाजुचे परिसर दररोज स्वच्छ करावा, असे सांगीतले.

यावेळी आयोजीत कार्यक्रमास पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा साहिल इारकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरी मयुर भुजबळ हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी व सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Latest Posts

Don't Miss