Latest Posts

मध्य रेल्वेने नागपूर-पुणे विशेष गाड्यांच्या फेऱ्यांची केली वाढ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : उत्सवाच्या काळात प्रवाशांच्या वाढलेल्या गर्दीला सामावून घेण्यासाठी, मध्य रेल्वेने नागपूर-पुणे उत्सव विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक सोय उपलब्ध करून देण्यासाठी हा विस्तार करण्यात आला आहे.

नागपूर-पुणे द्वैसाप्ताहिक विशेष गाडी –

गाडी क्र. ०१२०१ नागपूर-पुणे विशेष: ही गाडी मूळत: २८ ऑक्टोबर २०२४ ते ०७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान ४ फेऱ्या चालविण्यात येणार होती, आता ही गाडी २१ ऑक्टोबर २०२४ ते ११ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ३ अतिरिक्त फेऱ्यांसह चालविली जाणार आहे, ज्यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या ७ होईल.

गाडी क्र. ०१२०२ पुणे-नागपूर विशेष: ही गाडी मूळत: २९ ऑक्टोबर २०२४ ते ८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान ४ फेऱ्या चालविण्यात येणार होती, आता ही गाडी २२ ऑक्टोबर २०२४ ते १२ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ३ अतिरिक्त फेऱ्यांसह चालविली जाणार आहे, ज्यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या ७ होईल. या विशेष गाड्यांच्या थांब्यांमध्ये आणि रचनेत कोणताही बदल नाही.

आरक्षण : या विशेष गाड्यांसाठी आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आधीपासूनच खुले आहे आणि अधिकृत वेबसाइट www.irctc.co.in द्वारे देखील करता येऊ शकते.

Latest Posts

Don't Miss