Latest Posts

आंध्र प्रदेशात बसने घेतला पेट : चालकाच्या तत्परतेने वाचले प्रवाशांचे प्राण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पार्वतीपुरम (आंध्र प्रदेश) : देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या बस अपघातांच्या मालिकेला अंत दिसत नाहीये. ताजी घटना आंध्र प्रदेशातील पार्वतीपुरम जिल्ह्यात गुरुवारी ( ६) सकाळी घडली. ओडिशाकडे जाणाऱ्या सरकारी बसने अचानक पेट घेतला. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आणि सर्व प्रवाशी सुखरूप बचावले. बस पूर्णतः जळून खाक झाली असली तरी, एकाही प्रवाशाला इजा झाली नाही.

घटना कशी घडली? –
पोलिसांच्या माहितीनुसार, सुनकी घाट रस्ता ओलांडत असताना आरटीसी बसच्या इंजिनमधून अचानक धूर व ठिणग्या निघू लागल्या. डोंगर चढत असताना बस थांबली. चालकाने तत्काळ परिस्थिती ओळखून बस थांबवली आणि इंजिन तपासले असता आग लागल्याचे दिसून आले. त्याने तातडीने सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. काही क्षणांतच बसला पूर्णतः आग लागली.

चालकाचे कौतुक –
अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत काही मिनिटांतच आग विझवली. चालकाने दाखवलेली सतर्कता व तत्परता यामुळे मोठा अनर्थ टळला. प्रवाशांसह स्थानिक प्रशासनाकडून चालकाच्या धैर्याचे आणि प्रसंगावधानाचे कौतुक केले जात आहे.

बस अपघातांची मालिका कायम –
आंध्र प्रदेशात गेल्या काही महिन्यांपासून बस अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. नुकताच कुरनूल जिल्ह्यात बसला लागलेल्या आगीत तब्बल २० प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पार्वतीपुरममधील ही घटना पुन्हा एकदा राज्यातील प्रवासी सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करते.

Latest Posts

Don't Miss