विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : भारताने राजतंत्र साठी लोकशाही पद्धत स्विकारलेली आहे. त्यासाठी आवश्यक असलेला घटक म्हणजे मत अधिकार, जो गावातील सामान्य नागरीक ते देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेले व्यक्तीला सुद्धा समान प्रमाणात देण्यात आलेला आहे. एका व्यक्तीकडे एकच मत अधिकार व त्याची किंमत एकच, तोच मत अधिकार सामान्य जनतेने वापरून लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी मतदार नोंदणी अभियान भूमिपुत्र ब्रिगेड द्वारे विविध ठिकाणी राबविण्यात येत आहे. याच कडीचा भाग म्हनून नेरी (दुर्गापुर) येथे भूमिपुत्र ब्रिगेड च्या माध्यमातून १८ ऑगस्ट २४ रोजी लोकशाही बळकट करण्यासाठी, मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन डॉ. अभिलाषा गावतुरे (बेहेरे) यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आले होते होते. या शिबिरामध्ये जवळपास १०० हून अधिक नवीन मतदारांनी आपल्या नावाची नोंदणी केली आणि या शिबिराला नागरिकांच्या उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सुरेश कावळे, चंपत लेंनगुरे, नामदेव सोनूले, शंकर मांदाडे, रामदास कावळे, दिनेश कावळे, शुभम कावळे, आशिक शेंडे, खुशाल कावळे, राकेश लेनगुरे, अतुल भेंडारे, सागर लेनगुरे, उमेश मसके, सुरज लोनबले, प्रतीक गुरनुले, केतन निकोडे, निखिल कावळे, राजू कावळे, गौरव कावळे, संदीप कोटनाके, सुहास खनके, किरण दहिवले, सारिका कावळे, शोभा वाकुलकर यांचे सहकार्य लाभले.
