Latest Posts

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी १६ सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुलांमुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधेसाठी शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक  खात्यावर थेट रक्कम जमा करण्यात येते. सन २०२४-२५ वर्षासाठी स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी १६ सप्टेंबरपर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर नागपूर जिल्ह्यात शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.

या योजनेसाठी पुढील प्रमाणे निकष आहेत. विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा. तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. याचबरोबर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतला असावा. ही योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी आहे.

विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, दीक्षाभूमी चौक, नागपूर  येथे संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss