Latest Posts

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुला- मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते. या योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सन २०२४-२५ या वर्षासाठी https://hmas.mahait.org या पोर्टलद्वारे नागपूर जिल्हयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याकरीता संकेतस्थळ सुरु करण्यात आले असून अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करुन अर्जाची प्रत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर येथे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन शासकीय आय.टी.आय. समोर, श्रध्दानंद पेठ, दीक्षाभूमी चौक येथे संपर्क साधावा.

Latest Posts

Don't Miss