Latest Posts

स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यास शिष्यवृत्ती योजनेचा निर्वाह भत्ता

– स्वाधार योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वाधार योजनेच्या सुधारीत शासन निर्णयानुसार योजनेंतर्गत लाभास पात्र असलेल्या विद्यार्थ्यास भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत प्राप्त होत असलेल्या निर्वाह भत्त्याची रक्कम वजावट करुन उर्वरीत निर्वाह भत्ता, भोजन भत्ता, निवास भत्ता याची रक्कम अदा करण्यात येईल ही तरतुद रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत तालुका तथा जिल्हा स्तरावरील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ व्यवसायिक तथा बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात प्रवेशित असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी https://hmas.mahait.org या लिंकवर ऑनलाईन अर्ज सादर करावे.

योजनेच्या अधिक माहितीसाठी मार्गदर्शिका तयार करण्यात आली आहे. सदर मार्गदर्शिका क्यूआर कोड स्कॅन करुन विद्यार्थ्यांना माहिती जाणून घेता येणार आहे, असे समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss