Latest Posts

वैयक्तीक योजनांच्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : विशेष सहाय्य योजनेंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या वैयक्तीक लाभाच्या योजना नागपूर शहर मनपा क्षेत्रामध्ये राबविण्यात येत आहे. शहरातील ज्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ सूरु आहे अशा लाभार्थ्याना यापूढे मिळणारे अनुदान हे डि.बी.टी. प्रणालीद्वारे पाठविण्याबाबत शासनाचे आदेश आहेत.

याबाबत महानगरपालिका येथे शिबिराचे आयोजन करुन मंजूरी आदेश टोकन, आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक व दिव्यांग लाभार्थी प्रमाणपत्र तत्काळ मनपा झोननिहाय तलाठी यांच्याकडे जमा करण्याबाबत कळविण्यात आले होते. अनेक लाभार्थ्यांनी आजपावेतो कागदपत्रे जमा केलेली नाहीत. लाभार्थ्यांनी ९ ते २० डिसेंबरपर्यंत आपल्या जवळच्या नागपूर मनपा झोनमध्ये नेमून दिलेल्या तलाठी यांच्याकडे कागदपत्रे जमा करावी जेणेकरुन आपणास संजय गांधी निराधार योजनेचा वेळेत लाभ देण्याची कार्यवाही करणे सोयीचे होईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

Latest Posts

Don't Miss