Latest Posts

अर्थसहाय्य योजनेच्या लाभाकरिता कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करावी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पहाणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १ हजार तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५ हजार (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य द्यावयाचे आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर कापूस सोयाबीनची नोंद आहे, वनपट्टा धारक शेतकरी, ज्या गावातील भूमी अभिलेख संघनकीकरण झाले नाही, अश्या गावातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हा लाभ देण्यात येणार आहे.

सदरचे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. यासाठी सर्वसाधारण ६ हजार ७९३ खातेदार पैकी ३ हजार ५६३ खातेदार यांनी आपले आधार संमती दिली आहे. मात्र या व्यतिरिक्त राहिलेले ३ हजार २३० खातेदार यांनी त्यांचे आधार संमती आवश्यक आहे. या पैकी २ हजार ८२६ खातेदार यांनी ०३ ऑक्टोबर २०२४ अखेर ekyc पूर्ण केले आहे उर्वरीत शिल्लक ३ हजार ९६७ खातेदार यांचे करिता https://scagridbt.mahait.org/या पोर्टलवर पुढीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे ई- केवायसी करावयाचे आहे, त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदरच्या शेतकऱ्यांनी संबंधित कृषि सहाय्यकाशी संपर्क साधावा. कृषि सहाय्यक त्यांचे login मध्ये उपलब्ध सुविधेव्दारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांक वर येणाऱ्या OTP च्या माध्यमातून e-kyc करतील. तसेच शेतकरी स्वतः सुद्धा या पोर्टल वर जाऊन OTP च्या माध्यमातून किंवा Biometric च्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात (CSC) जावून सुद्धा e-kyc करु शकतात.

याकरिता पोर्टलच्या मुख्य पानावर Disbursement status येथे click केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक टाकावा. नंतर मोबाईलवर प्राप्त OTP किंवा CSC केंद्रातील Biometric मशिनच्या माध्यमातून ते e-kyc पूर्ण करु शकतात. तरी, आपल्या गावाच्या कृषि सहाय्यक यांना आपले आधार संमती व E Kyc चे काम पुर्ण करण्यास सहाय्य करावे. व सदर काम तात्काळ पुर्ण करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रिती हिरळकर यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss