Latest Posts

पीएम सुर्यघर योजनेचा लाभ घ्या : जिल्हाधिकारी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर अध्यक्षतेखाली येथे पी. एम. सुर्यघर योजनेबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस अधिक्षक अभियंता महावितरण राजेंद्र गिरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा यांचे प्रतिनिधी बोरकर, शहरी स्वराज्य संस्थे मधुन प्रतिनिधी त्रिवेणी पोहरकर नगराध्यक्ष लाखणी, ग्रामिण स्वराज्य संस्थे मधुन प्रतिनिधी ईलमे साहेब जिल्हा परिषद सदस्य भंडारा, जिल्हा व्यवस्थापक महाऊर्जा. पाटेकर, कार्यकारी अभियंता भंडारा, साकोली, कार्यकारी अंभियंता भंडारा प्र. विभाग आणि सर्व उपविभागीय अभियंते उपस्थित होते.

या योजनेची चित्रफित दाखवण्यात आली आणि सर्वांना प्रचाराकारीता मुबलक पॅम्पलेटस् दिले. भंडारा जिल्ह्याकरिता दिलेले उद्दिष्ट आणि ते साध्य करण्याकरिता सर्वांनी चर्चा करून रुपरेषा ठरवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात.

काय आहे प्रधानमंत्री सुर्यघर योजना-प्रधानमंत्री सुर्यघर योजनेचा लाभ मिळवून कायमस्वरुपी विजबिलाच्या चिंतेमधून सुटका मिळविण्यासाठी, पीएम सुर्योदय योजना राबविण्यात येत आहे.

सुर्योदय योजना अंतर्गत मोफत सौर पॅनल देण्याची मोठी घोषणा केली. या अंतर्गत देशातील नागरिकांना लाभ मिळविण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येईल.

या योजनांच्या माध्यमातुन लाभ कोण घेवू शकतो ?-

या योजनाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा भारत देशाचा नागरिक असला पाहिजे, तसेच याचा लाभ हा ज्या ठिकाणी अद्याप विजेची सुविधा उपलब्ध झालेली नाही अशा ठिकाणच्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे. हा लाभ हे शहरी तसेच ग्रामीण दोन्ही भागांकरीता अनुज्ञेय असणार आहेत. सदर लाभाकरीता लाभार्थी व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे १लाख ५ हजार रुपये अथवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक असणार आहेत.

लाभाचे स्वरुप –

या योजनांच्या माध्यमातुन १ किलो वॅट क्षमत असणारे सोलर पॅनल करीता ३० हजार रुपये तर २ किलो वॅट क्षमता असणाऱ्या सोनल पॅनल करीता ६० हजार रुपये तर ३ किलो वॅट क्षमता असणाऱ्या सोलर पॅनल करीता ७८ हजार रुपये, तर त्यापेक्षा अधिक किलो वॅट १० किलो वॅट पर्यंत करीता ७८ हजार रुपये केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाणार आहेत.

अर्ज प्रक्रिया –

सदर योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्यासाठी https://pmsuryaghar.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवदेन सादर करु शकतात.

Latest Posts

Don't Miss