Latest Posts

शहरात प्लॅस्टिक वापरावर बंदी : १५ किलो प्लॅस्टिक जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : २० मार्च रोजी बुधवार ला डेपो विभागामार्फत कार्यवाही करण्यात आली अंदाजे ३० आस्थापणे (हॉटेल, मार्केट, फिश / मटन /चिकन मार्केट) वर कार्यवाहित एकुण १५ किलो एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून रु. ८९०० दंड आकारण्यात आला. सदर दुकानदारांना नोटिस बजावण्यात आली आले.

सदर कार्यवाही नियमित सुरू राहणार असून याबाबत सर्व दुकाने संस्था, आस्थापणे, मार्केट संघटना कार्यालये व व्यक्तीनि नोंद घ्यावी. संपूर्ण शहरात प्लॅस्टिक बंदी मोहीम प्रभावीपाने राबवायची असून, सदर प्लॅस्टिक बंदी मोहिमेच्या यशस्वी वाटचाली करिता जप्ती पथक नेमण्यात आले आहे. सदर पथकामार्फत प्लॅस्टिक बंदी मोहिमेकरिता आस्थापणाची तपासणी, स्थळ पंचनामा करणे, नोटिस बजावणे तथा दंडात्मक कार्यवाही करणे सुरु आहे.

दंडात्मक कार्यवाही करिता केंद्र शासनाचे प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१६ व त्या खालील सुधारणा अन्वये जारी केलेल्या अधिसूचनेस अनुसरून प्लॅस्टिक बंदी, अविघटनशील वस्तूचे (उत्पादन, वापर विक्री वाहतूक, हाताळणी साठवणूक) अधिसूचना च्या अमलबजावणी बाबत व नियमांतर्गत कार्यवाही करणेसाठी महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण) कायदा २००६ च्या कलम १२ अन्वये. पहिला गुन्हा रु. ५००० दंड प्रति घटना, दूसरा गुन्हा रु. १०००० दंड प्रति घटना, तिसरा गुन्हा रु. २५००० दंड व ३ महीने कारावास प्रति घटना आहे.

केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने ऑगस्ट २०२१ मध्ये अधिसूचित केलेल्या सुधारित प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०२१ नुसार तसेच ३० सप्टेंबर २०२१ पासून ७५ मायक्रॉन पेक्षा कमी आकाराच्या सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक साहित्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विशाल वाघ यांनी प्लॅस्टिक मुक्त शहर या मोहिमेस सर्व नागरिकानी नगर परिषद ला सहकार्य करण्यात असे आवाहन केले.

Latest Posts

Don't Miss