– तथाकथित पर्यावरणवादीचा तक्रारीवरून नियमक मंडळने टाळेबंद करण्याचे निर्देश : कामगार युनियनचा आरोप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : शहराला लागूनच असलेल्या बामणी येथील बामणी प्रोटीन्स लिमिटेड ला १३ मार्च पासून महाराष्ट्र प्रदूषण नियमक मंडळाने टाळेबंद करण्याचे निर्देश दिल्यामुळे येथील कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. तसेच ही कारवाई चंद्रपूर येथील तथाकथित पर्यावरणवादी बेले यांच्या प्रदूषण विषयक तक्रारीवरून केल्याचे आरोप भारतीय केमिकल वर्कस युनियन चे अध्यक्ष देवराव निंदेकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
१५ मार्च रोजी येथील सा. बा. विश्राम गृह मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की प्रशासनाने प्रकरणाची शहानिशा न करता कंपनी व्यवस्थापनाला कोणतीही संधी व कामगारांचा व त्यांचा परिवाराचा भविष्याचा कोणताही विचार न करता उद्योग बंद करण्या संबंधीच्या सूचना कंपनी व्यवस्थापनास दिल्या, त्यामुळे कंपनीमधील स्थायी अस्थायी स्वरूपातील जवळपास ५०० कामगारांवर व त्यांच्या परिवारावर उपासमारीची पाळी आली आहे.
कामगारांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाच्या, उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे जे कामगार कोरोना काळात उद्योगातील ५०% पेक्षा जास्त कामगार कोरोना बाधित असताना सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देश हितासाठी २४ तास उत्पादन सुरू ठेवून मेडिकल इंडस्ट्रीज ला लागणाऱ्या जिलेटिन च्या कच्च्या मालाचा पुरवठा थांबू दिला नाही अशा कामगारांवर आज दुर्भाग्याने उपासमारीची पाळी आली आहे. अश्या उद्योगातील कामगारांवर या प्रकारचा अन्याय होणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे. प्रशासनाने उद्योगावर कारवाई करण्यापूर्वी तक्रार कत्यांच्या तक्रारीवर विचार करून प्रकरणाची सत्यता तपासून त्यानंतरच निर्णय घेणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही.
सदर प्रकरणा विषयी आपली बाजू मांडण्याकरिता आणि या कारवाईमुळे होणाऱ्या नुकसानाचे स्वरूप भविष्यात भयानक होऊ शकते असे निंदेकर यांनी सांगितले.
