विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर चे युवक मुल ला जाताना चिचपल्ली जवळ अपघात झाला. त्यात ४ जण जखमी झाले असून एक गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज मुल येथे विधान सभा नामांकन अर्ज दाखल करण्याच्या रॅली मध्ये सहभाग होण्याकरिता जात असताना ११ वाजताच्या सुमारास चिचपल्ली जवळ वळणावर अपघात झाला. त्यात गांधी वॉर्ड बल्लारपूर येथील चार युवक जखमी झाले. त्यात स्वप्नील चिंचोळकर, अक्षय वांढरे, नंदू शेंडे व अमोल वासेकर चा समावेश आहे.
चंद्रपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून स्वप्नील चिंचोळकर व अक्षय वांढरे यांना आयसीयू मध्ये भरती केले आहेत.
