विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन बल्लारपूर मधील महिला व पुरुषांनी मनसे पक्षांत घेतले.
मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या हस्ते चंद्रपूर येथील जिल्हा मनसे कार्यालयत पुरुष व महिलांनी जाऊन प्रवेश घेतला.
विष्णू बुजोने जिल्हा उपाध्यक्ष यांचा मार्गदर्शना खाली मनसे बल्लारपूर शहर अध्यक्ष उमेश कुंडले यांचा नेतृत्वाखाली प्रवेश घेण्यात आले. अरुणा तोडसाम, स्मिता आत्राम, बबिता भगत, रजिता आवळे, शमा रणदिवे, शशिकला सोनावण बोंडे, रघुना आवळे, मनोज तोडसाम, विजेंद्र परमार, घनश्याम कुंडवे, योगराज चौधरी, चेतन मंगाम सह आदी ने मनसेत प्रवेश केला.
यावेळी बल्लारपूर तालुका अध्यक्ष गोपाळ मोहुर्ले सह मनसे सैनिक उपस्थित होते.
