Latest Posts

बल्लारपूर पोलिसांची जुगारावर धाड : आठ दुचाकी जप्त, मात्र कारवाईवर शंका उपस्थित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur): दादाभाई पॉटरीजच्या मैदानावर लाखो रुपयांचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर बल्लारपूर पोलिसांनी २९ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकत कारवाई केली. या धाडीत पोलिसांनी घटनास्थळावरून आठ मोटारसायकली व मोपेड जप्त करून पोलिस ठाण्यात जमा केल्या.

पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि सर्वजण पसार झाले. त्यामुळे पोलिसांना एकाही आरोपीस पकडता आले नाही. या प्रकरणानंतर मात्र पोलिसांच्या कारवाईवर शंका उपस्थित होत आहे.

जप्त करण्यात आलेल्या दुचाकींच्या नंबरच्या आधारे संबंधित आरोपींपर्यंत पोहोचणे शक्य असूनही, पोलिसांनी या वाहनांना केवळ नो-पार्किंगचा दंड ठोठावून सोडल्याचे समजते. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि कारवाईच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या कारवाईत पोलिस लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करू शकत होते, मात्र  माशी नेमकी कुठे शिंकली? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

Latest Posts

Don't Miss