Latest Posts

बल्लारपूर नगर परिषदे तर्फे रस्त्यावरील मोकाट व बेवारस जनावरे पकडण्याची धडक मोहिम

– जनावरे मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : शहरामधील मुख्य रस्ता, जुने बस स्थानक, रेल्वे चौक, काटागेट या परिसरामध्ये मागील काही दिवसान पासुन मोकाट बेवारस जनावरे रस्त्याचे मधोमध बसून असतात त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होउन अपघात घडण्याची शक्यता लक्षात घेता बल्लारपूर नगर परिषद मार्फत संपूर्ण बल्लारपूर शहरामध्ये जाहिर मुनादीव्दारे मोकाट बेवारस जनावरे पकडणे संबंधीची सुचना प्रसिध्द करूण २२ जुलै २०२४ ला नगर परिषदे मार्फत प्रत्यक्ष जनावरे पकडणे संबंधीची मोहिम सुरू करण्यात आली आहे.

सदर मोहिमे दरम्यान नवीन वस्ती विभाग परिसरामधील एकुण ९ जनावरे पकडण्यात आली असुन सदर जनावरांना कांजी हाउस मध्ये टाकण्याची कार्यवाही नगर परिषद प्रशासना मार्फत करण्यात आली असुन बल्लारपूर शहरामधील मोकाट बेवारस जनावरे पकडणे बाबतची मोहिम दिवस व रात्र दोन्हो पाळीमध्ये राबविण्यात येणार आहे.

जनावरे मालकांनी आपली जनावरे रत्यांवर फिरणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. शहरामधील रस्त्यांवर फिरणारे मोकाट बेवारस जनावरे मालकांना  मुख्याधिकारी नगर परिषद, बल्लारपूर यांचे वतीने सुचीत करण्यात येत आहे की, त्यांनी रस्त्यांवर फिरणारी आपली जनावरे घरी बांधुन ठेवावी. अन्यथा मोहिमे दरम्यान पकडण्यात आलेली आलेली जनावरे मालकांवर नगर परिषद मार्फत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. याबाबत गंभिरतेने नोंद घ्यावी, असे आवाहन विशाल वाघ प्रशासक तथा मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss