विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्षामध्ये आचारसंहिता तक्रार निवारण कक्षाचे गठन करण्यात आलेले आहे. नियोजन भवन येथील तळमजल्यावर हा कक्ष कार्यरत आहे.
निवडणूक प्रक्रिये दरम्यान आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यासाठी या कार्यालयात कक्षात संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत.
०७१८४-२९९४३४,०७१८४-२९५७०१ तर ईमेल आयडी mcc bhandara@gmail.com तर १९५० या टोल फ्री क्रमांकावर देखील माहिती विचारता येईल. या पक्षाचे प्रमुख अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे आहेत.
