Latest Posts

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ०२ चारचाकी वाहन व अवैध दारूसह एकूण १२ लाख ५ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त

– गडचिरोली पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक- २०२४ च्या मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याकरीता बऱ्याच दारुविक्रेत्यांकडून छुप्या मार्गाने शेजारील चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात अवैय दारु पुरवठा करून जिल्ह्याच्या विविध भागात पोहचविण्याची दाट शक्यता असते. त्याद्वारे मतदान प्रक्रियेवर प्रभाय टाकूण निवडणुक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यात अडथळा निर्माण होत असते.

स्थानिक गुन्हे शाखेची चमू आगामी निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमिवर गडचिरोली परिसरात गस्त करीत असतांना १२ नोव्हेंबर २०२४ रोजी गोपनिय सुत्रांकडून माहिती मिळाली की, गडचिरोली शहरातील गोकुळनगर परिसरातील अवैध दारू विक्रेता आकाश भरडकर हा त्याचा साथीदार रोशन लोखंडे याच्या मदतीने मौजा ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर येथून गडचिरोली परिसरात अवैद्य देशी व विदेशी दारुची वाहतुक करून आगामी विधानसभा निवडणुक- २०२४ च्या पार्श्वभूमीवर मनोज मुजुमदार व क्रिष्णा मुजुमदार यांना पुरवठा करणार आहे.

सदर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने पोरेड्डीवार इंजिनिअरींग कॉलेज, बोदली परिसरात सापळा रचून असतांना खबरेतील दोन वाहने समोरून येतांना दिसताच त्यांना थांबवून वाहनांची तपासणी केली असता, त्यात रॉकेट देशी दारुचे १३० खरड्यांचे बॉक्स मिळून आले. सदर दारुचे बॉक्स व दारु वाहतुकीकरीता वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण १२ लाख ५ हजार रु. चा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त करून वाहनातील आरोपी आकाश भाऊराव भरडकर, रा. गोकुळनगर, रोशन हरिदास लोखंडे, रा. उंदरी, ता. उमरेड, जि. नागपूर यांना अटक करून त्यांचे व पाहिजे असलेले आरोपी मनोज मुजुमदा, रा. एटापल्ली व क्रिष्णा मुजुमदार, रा. कसनसूर यांचे विरुद्ध पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुक- २०२४ अवघ्या आठ दिवसांवर येवून ठेपली असतांना स्थानिक गुन्हे शाखेने १३० देशी दारुचे बॉक्स व वाहने जप्त केल्याने कसनसूर व एटापल्ली सारख्या दुर्गम भागात निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यास मोलाचा हातभार लागणार आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, सपोनि. राहुल आव्हाड यांचे नेतृत्यात पोअं/ प्रशांत गरफडे, नामदेव मटारकर, चापोअं/दिपक लोणारे यांनी केलेली आहे.

Latest Posts

Don't Miss