विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : राष्ट्रीय मिलिट्री स्कुल बेलगाव येथील जीडी करीता २५७ पदे व लिपिक व ट्रेडमनची ५३ पदे भरण्याकरीता १६ नोव्हेंबर पर्यंत भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती रॅलीस इच्छुक पात्र जिल्ह्यातील युवक तसेच सर्व सैनिक व विधवा, विरनारीचे पाल्य तसेच सेवारत सैनिकाचे पाल्य, युध्दातील जखमी सैनिकाचे भाऊ व पाल्य, खेळाडू यांनी उपस्थित राहून रॅलीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीपती मोरे यांनी केले आहे.
अधिक माहिती www.jointerritorialarmy.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे किंवा रोजगार समाचार यावर पहावे तसेच अधिक महितीकरीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीपती मोरे यांनी कळविले आहे.
