Latest Posts

अर्जुनी मोरगाव येथे १९ सप्टेंबर ला जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया (Gondia) : जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गोंदिया व शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय अर्जुनी मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने १९ सप्टेंबर २०२४ ला सकाळी ११ वाजता शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथे जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये १४ कंपन्यांचे उद्योजक सहभागी होणार असून १ हजार ३३५ रिक्त जागांवर भरती करणार आहेत.

इयत्ता १० वी व १२ वी पास, आयटीआय, तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर अशा पात्रता असणाऱ्या बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्ण संधी आहे. उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची छायांकीत प्रमाणपत्रे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया या कार्यालयाचे नोंदणी कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया येथील दूरध्वनी क्रमांक ०७१८२-२९९१५० यावर किंवा gondiyarojgar@gmail.com या ई-मेल आयडीवर संपक साधावा. या रोजगार मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त राजु माटे यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss