Latest Posts

डाक विमा अभिकर्ताचे नेमणुकीकरीता अर्ज आमंत्रित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : भारतीय डाक विभागाकडून डाक जिवन विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात टपालजीवन विमा योजनेसाठी थेट अभिकर्ताची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी ३० डिसेंबर २०२४ रोजी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विहित नमुन्यातील अर्ज प्रधान डाक घर येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष पुर्ण असावे, त्याचे शिक्षण किमान १० वी पास असावे. बेरोजगारीत किंवा स्वयंम रोजगारीत शिक्षित युवा, माजी जीवन सल्लागार, इंन्शुरन्स कंपनीचे माजी एजंन्ट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ सेविका, सेवा निवृत्त शिक्षक व इतर उमेदवारांना योजने चा लाभ घेता येणार आहे.

उमेदवारांची निवड थेट मुलाखती द्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संबंधाचे कौशल्य, जीवन विम्याबाबतचे ज्ञानाच्या आधारावर निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारास ५ हजार रुपयाची अनामत रक्कम ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी एनएससी अथवा केव्हीपीच्या स्वरुपात राहील. प्रशिक्षण पुर्तता नंतर डाक विभागाकडून तात्पुरता परवाना देण्यात येईल. जो आयआरडीए ची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायमच्या परवान्यामध्ये रुपातंरीत  केल्या जाईल. आयआरडीए ची परवाना परीक्ष नियुक्तीनंतर ३ वर्षाचे आत पास करणे अनिवार्य राहील.

निवड झालेल्या उमेदवारास टपाल विभागने वेळोवेळी ठरविलेले कमिशन दिले जाईल. उमेदवारांनी अधिक्षक डाकघर कार्यालय येथे नमुन्यातील अर्ज आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र यामध्ये इयत्ता १० वी किंवा १२ वी बोर्डाचे प्रमाणपत्र, जन्मतारखेचे प्रमाणपत्र, संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड व अन्य संबंधीत दस्त ऐवज सोबत घेऊन ३० डिसेंबर २०२४ रोजी दुपारी २ वाजता उपस्थित राहावे, अधिक माहितीसाठी जवळच्या डाक कार्यालयाशी किंवा www.maharashtrapost.gov.in या संकेतस्थळाला भेट दयावी, असे अधीक्षक डाकघर वर्धा यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss