Latest Posts

स्वाधार योजनेसाठी अर्ज करा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : सन २०२४-२५ पासुन नव्याने कार्यरत झालेले ऑनलाईन पोर्टल हे शासकिय वसतीगृह प्रवेश प्रक्रिया तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता एकत्रीत तयार केलेले असल्याने शासकिय वसतीगृहास ऑनलाईन अर्ज करणाऱ्या  ज्या पात्र अनुसुचीत जाती व नवबौध्द प्रवर्गाच्या विदयार्थ्यांची गुणवत्ते अभावी शासकिय वसतीगृहास निवड झालेली नाही अशा विदयार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता ग्राहय धरले जातील व नियमानुसार पुढील पडताळणीसाठी संबंधीत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगइन वर अग्रेषीत केले जातील.

सदर माहिती पोर्टलवरील लॉगइन मध्ये विदयार्थ्यांनी परीपुर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. विदयार्थ्यांनी सदर माहिती अपुर्ण भरल्यास सदर अर्ज अपात्र करण्यात येतील व त्यासाठी सर्वस्वी स्वतः विदयार्थी जबाबदार राहील याबाबत नोंद घेण्यात यावी. अर्ज करण्याची अंतीम १९ सप्टेंबर २०२४ अर्ज करण्याकरीता ऑनलाइन पोर्टल https://hmas.mahait.org सदर योजनेच्या ठळक निकषामध्ये विदयार्थी पात्र ठरत नसल्यास अश्या विदयार्थ्यांचे अर्ज थेट अपात्र ठरविण्यात येतील.

Latest Posts

Don't Miss