Latest Posts

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : सहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या जिल्हा कार्यालय वर्धा तर्फे अनुसूचित जातीतील मांग, मातंग या समाजातील बारा पोट जातीतील विद्यार्थी, विद्यार्थीनी करिता महामंडळामार्फत शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.

जे विद्यार्थी/विद्यार्थीनी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात १० वी व १२ वी पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी या अभ्यासकमासाठी सरासरी ६०% किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेऊन उतीर्ण झाले असतील असे विद्यार्थी/विद्यार्थीनीने महामंडळाचे जिल्हा कार्यालय नागपूर येथे अर्ज सादर करावे, किंवा नागपूर जिल्हा कार्यालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन २५ जुलैपर्यंत अर्ज करावे. कार्यालयाचा ईमेल आयडी dmslasdcwardha@gmail.com किंवा जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वर्धा येथे संपर्क साधावा.

Latest Posts

Don't Miss