– माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी जि.प. मुख्यकार्यपालन अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : अहेरी तालुक्यातील मौजा व्येंकटरावपेठा येथील अंगणवाडी क्रमांक १ मध्ये लाभार्थी आले होते असता. अंगणवाडी मध्ये असलेल्या धान्य निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे लाभार्थी येऊन वापस घेले होते.
व्येंकटरावपेठा हा गाव अहेरी तालुक्यातील ५ किमी अंतरावर असून पुरवठादार निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप होत असून हे मात्र फक्त या अंगणवाडील समस्या नसून हे संपूर्ण तालुक्यातील लहान मुलांचा जीवाशी खेळण्याची काम पुरवठादार करिता आहे. तरी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील जि.प. शाळेला व अंगणवाडी पोषण आहार पुरवठा करणाऱ्या पुरवठा धारकांची चौकशी करून. दोषींवर कारवाई करण्यात यावे. नाही तर जिल्हा परिषद कार्यालय समोर अंगणवाडी लहान बालकांना व जि.प. विध्यार्थी पालकांना घेऊन आंदोलन करण्यात येईल अशी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी जि.प. मुख्यकार्यपालन अधिकारी यांना निवेदन देण्यात आली आहे.
यावेळी माजी सभापती भास्कर तलांडे, माजी जि.प. सदस्य अजय नैताम, माजी जि.प. सदस्य सुनीता कुसनाके, माजी सभापती सुरेखा आलम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
