Latest Posts

अहेरी डेपोच्या वाहकांची मनमानी कारभार : माहामंडळाची बस जणमाणसांची हक्काची बस हे फक्त कागदावरच

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli): राष्ट्रीय माहामर्ग ३५३ सी हा शुभाषनगर ते आलापल्ली  रस्ता बंधकामामुळे मागील काही महिन्यापासुन वाहतुकीसाठी बंद आहे पण पर्यायी व्यवस्था म्हणून महागाव – अहेरी मार्गे आलापल्ली जाण्याचा पर्यायी मार्ग आहे.अहेरी आगाराच्या आणि इतर आगाराच्या बसेस याच पर्यायी मार्गाचा वापर करत असतात पण अहेरी आगाराच्या वाहकाचा वेगळाच मनमानी नियम आहे यात असे की बसचा महागाव मार्ग तिकीट मशीन मध्ये पहिलेच सेट आहे त्यामुळे आलापल्लीची तिकीट काढता येत नाही.

त्यामुळे तुम्हची तिकीट आलापल्ली निघत नाही म्हणत अहेरीची तिकीट जबरदस्तीने किंवा वादविवाद करत देत असतात.यात आम्ही काहीही करू शकत नाही पण तिकिट आलापल्ली मार्गेची अहेरी पर्यंतची देतो जर मशीन मध्ये माहागाव मार्ग सेट असेल तर तिकीट चे भाडे कमी असायला पाहिजे पण यात प्रवाशांचे उलट जास्त भाडे घेऊन प्रवाशांना आलापल्लीला न नेता अहेरी ला जबरदस्ती नेऊन सोडून देतात यात वाहकाची मनमानी कारभार समोर येतो अशा मनमानी काभारमुळे प्रवाशांना अधिकचे भाडे देऊनही आलापल्ली ला जाता येत नाही एकट्या वाहकांमुळे एका प्रवाशाला जवळपास ४०/- चा अधिकचा भुर्दंड बसत आहे.

वाहकाचा असा प्रकार आधार प्रमुख आणि आगार व्यवस्थापक यांच्या लक्षात कित्येकदा लक्षात आणून देण्यात आला असला तरी सर्वच्या सर्व मुंग गिळून गप्प का? असा सर्वसामान्य प्रश्न नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पडला आहे असाच प्रकार चंद्रपूर ते अहेरी दरम्यान बस क्रमांक MH १४ LX – ८८४३ मध्ये प्रवास करणाऱ्या विनय गुप्ता या प्रवाशास वाहक ए.डी. पुंगाटी द्वारा झाला आहे आता यात महामंडळ कोणती कार्यवाही करनार याकडे सर्वसामाण्याचे लक्ष आहे.

Latest Posts

Don't Miss