– अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधि / वर्धा (Wardha) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत निम्न कृषी शैक्षणिक सत्र २०२४-२५ करिता कृषी पदविका अभ्यासक्रमाच्या शिल्लक जागेकरिता विशेष वाढीव प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने राबविण्यात येत आहे.
ऑनलाइन प्रवेश अर्ज व माहिती पुस्तिका http://pdkv.ac.in या संकेतस्थळवर उपलब्ध असून २० ऑगस्ट सकाळी ११.३० वाजता पासून प्रक्रिया सुरू होणार असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०२४ आहे.
विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिका वाचून अचूक ऑनलाइन अर्ज संकेतस्थळावर भरावा. प्रवेश अर्ज किंवा कागदपत्रे स्वत: किंवा टपालाने, कुरीयरने कार्यालयाला पाठवू नये. ज्या विद्यार्थ्यांचे नाव अंतिम यादीत आले असेल त्यांनी २९ ते ३० ऑगस्ट दरम्यान प्रवेश निश्चित करण्यासाठी सकाळी ८.३० ते ११.३० पर्यंत विद्यालयात उपस्थित रहावे.
ज्या विद्यार्थ्यांना कृषी विज्ञान तंत्र विद्यालय सेलसूरा येथे प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांनी प्रवेश अर्ज भरतेवेळी विद्यालयाचा सांकेतिक कोड १२०३ अर्जामध्ये नमुद करावा, असे सेलसुरा येथील कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.पी. जंगवाड यांनी कळविले आहे.
