विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली इथे असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध अभावीपणे आज आक्रमक भूमिका घेतली व आंदोलन केले यात मुलांनी चांगली उपस्थिती दाखवली व अनेकांनी समस्या दर्शवले.
एक महिना निघूनही गेला तरी निवेदन देऊनही अनेक समस्यांचे निराकरण न केल्यामुळे अभावीप तीव्र आंदोलन केले. ग्राउंड साफ करणे ग्राउंडच्या भोवताली लाईट होस्टेलच्या आवारात लाईट लावणे यांच्या वस्तीगृहातील खिडकी दरवाजे आणि संडास- बाथरूम दरवाजे सगळे काही साफ करणे, प्रत्येक रूममध्ये लाईट, फॅन त्याची व्यवस्था करून देणे, होस्टेलच्या भोवताली सगळा परिसर स्वच्छ करणे, होस्टेलच्या ग्राउंड फ्लोअर चालू करणे, वस्ती गृह कॅन्टीन सुरू करून दिले, मागील चार वर्षापासू भत्ता न मिळाला याची यादी बनवून देणे व इथे पैसे कुठे गेले याचा पण उत्तर अभाविप कार्यकर्त्यांनी मागितला.
क्लास टीचर्स नाही ट्रेड मध्ये साहित्य उपलब्ध नाही मशीन सुरु नाही. कॉलेजमध्ये पाण्याची सोय नाही, होस्टेलमध्ये अनेक प्रॉब्लेम आहे त्या कित्येक वर्षापासून ते तसेच आहे त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष नाही त्यामुळे तिथे वॉर्डन उपलब्ध करून देणे, मुलींच्या वस्तीगृहात अनेक समस्या तरी त्या अजून पर्यंत सोडवले नाही ते लवकरात लवकर सोडवावे. असे मागणी अभाविप कार्यकर्त्यांनी केली यावेळी, उपस्थित असलेले गडचिरोली नगराचे नगर मंत्री अभिलाष कुनघाडकर नगर सहमंत्री दीक्षा पिपरे, नगर सह मंत्री पुनम कुंभरे, गडचिरोली आरमोरी भाग संयोजक प्रणय मस्के व महाविद्यालय कार्यकारणी उपस्थीत होते. या सगळ्या मागण्या दहा दिवसात पूर्ण न केल्यास अभावीप सगळ्या विद्यार्थ्यांची घेऊन ठीया आंदोलन करेल.
