Latest Posts

७५ टक्के अनुदानावर मिळणार मेंढी गट !

– महामेष योजना : पायाभूत सोयीसुविधांसाठीही मदत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : जिल्ह्यात मेंढीपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच राज्यातील भटक्या जमाती व तत्सम (भ.ज.क) समाजातील पशुपालकांना बळ देण्यासाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबविण्यात येत आहेत. योजनेंतर्गत मेंढीगट ७५ टक्के अनुदानावर दिले जाणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

राज्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर आणि तत्सम जमातीच्या उन्नतीसाठी शासनाच्या वतीने राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा सदरील प्रवर्गातील मेंढीपालन करणाऱ्या कुटुंबांना लाभ होत आहे. दरम्यान, ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या अनुदान योजनेतून मेंढ्यांसाठी चराई अनुदान, मेंढी-शेळीपालनासाठी जागा खरेदी अनुदान तसेच कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी १२ ते ३६ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोयीसुविधांसह २० मेंढ्या आणि एक मेंढानर अशा मेंढीगटाचे ७५ टक्के अनुदानावर वाटप, सुधारित प्रजातींच्या नर मेंढ्यांचे ७५ टक्के अनुदानावर वाटप, मेंढीपालनासाठी पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५ टक्के अनुदान दिले जाईल.

मेंढीपालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५ टक्के अनुदान, हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्यासाठी, गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदीसाठी ५० टक्के अनुदान, पशुखाद्य कारखाने उभारणीसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येत आहे.

www.mahamesh.org.in या site वर online अर्ज करण्यात यावे.

Latest Posts

Don't Miss