Latest Posts

५ वर्षीय मुलीचे लैंगिक शोसन : आरोपी विधी संघर्ष ग्रस्त बालक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : शहरात एका ५ वर्षीय मुलीवर १६ वर्षीय मुलाने लैंगिक शोसन केल्याची घटना उघडकीस आली असून नागरिकात रोष व्यक्त होत आहे.

शहरातील एका ट्रक वर खाजगी ड्रायव्हर म्हणून काम करणारे आपल्या दोन मुली व पत्नी सहित राहतात. १० नोव्हेंबर रोजी त्यांच्या पत्नीचे टीईटी परीक्षा असल्यामुळे ते आपल्या ५ वर्षीय मुलीला घरा शेजारी राहणाऱ्या च्या घरी ठेवून आपल्या पत्नी ला चंद्रपूर वरून आण्याकरिता गेले होते. सायंकाळी घरी आले असता त्यांच्या पत्नी ने आपल्या मुलीला नाष्टा करायला आवाज दिले. ५ वर्षीय मुलगी घरी आली असता खाली बसून गेली. त्यावरून तिच्या आईने तिला विचारले असता १० वी मध्ये शिकणारा १६ वर्षीय मुलाने तिच्या सोबत घानरडे काम केले आहे. लगेच तिचा आईने त्याचा आई वडील ही गोष्ट सांगितले व शहरातील एका खाजगी रुग्णालयात तिला उपचार करायला नेले. महिला डॉक्टरांनी त्या मुलीला तपासले असता त्यांना पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यास सांगितले.

१० नोव्हेंबर रोजी त्या मुलीच्या आई वडिलांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिले असून पोलीसांनी त्या १६ वर्षीय मुलावर बीएनएस २०२३, ६४ (२)(i), ६५ (२), पॉस्को ६, ४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास बल्लारपूर पोलीस करत आहे.

Latest Posts

Don't Miss