Latest Posts

४ बँकांसह या फिनसर्व्ह कंपनीला ठोठावला दंड : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील काही बँकांवर मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेने एसजी फिनसर्व्ह लि. २८.३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

नोंदणी प्रमाणपत्राशी संबंधित काही अटींचे पालन न केल्यामुळे कंपनीला दंड ठोठावण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. SG Finserv पूर्वी मुंगीपा सिक्युरिटीज म्हणून ओळखले जात होते. RBI वेळोवेळी वित्तीय संस्थांच्या गैर-अनुपालनाच्या मुद्द्यांवर लक्ष ठेवते आणि दंडासारख्या कारवाई देखील करते जेणेकरून कंपन्या आणि बँका निगराणीखाली राहतील.

एसजी फिनसर्व्हला २८.३० लाख रुपयांचा दंड –
आरबीआयने सोमवारी सांगितले की, इतर गोष्टींबरोबरच २०२२-२३ या आर्थिक वर्षातील कंपनीच्या आर्थिक तपशीलांमध्ये नोंदणी प्रमाणपत्र (सीओआर) शी संबंधित विशिष्ट अटींचे पालन न केल्याचे उघड झाले आहे. जारी केलेल्या सीओआरमधील विशिष्ट अटींचे पालन न करूनही कंपनीने लोकांकडून ठेवी म्हणून पैसे घेतले आणि कर्ज दिले, असे रिझर्व्ह बँकेने एका निवेदनात म्हटले आहे.

अरुणाचल प्रदेश ग्रामीण बँकेलाही १४ लाखांचा दंड –
रिझर्व्ह बँकेने अरुणाचल प्रदेश ग्रामीण बँकेला १४ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. आर्थिक निकष आणि नो युवर कस्टमर (केवायसी) मजबूत करण्याच्या काही सूचनांचे पालन न केल्यामुळे बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. अशा प्रकारची चूक लहान किंवा ग्रामीण भागातील बँकांमध्ये होते परंतु RBI ही बँकांची नियामक आहे आणि ती वेळोवेळी कारवाई करत असते.

तीन सहकारी बँकांवर आरबीआयची कारवाई –
याशिवाय इतर तीन सहकारी बँकांना काही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. जिल्हा सहकारी सेंट्रल बँक लिमिटेड- भिंड, मध्य प्रदेश, दि अर्बन को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड धरणगाव, महाराष्ट्र आणि श्री कलहस्ती को- ऑपरेटिव्ह टाऊन बँक लिमिटेड- आंध्र प्रदेश या बँका आहेत.

Latest Posts

Don't Miss