Latest Posts

३ सरकारी बँकांनी लॉन्च केली विशेष FD : व्याजदर ७ टक्क्यांपेक्षा जास्त

विदर्भ न्युज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mambai) : जुलैमध्ये, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ महाराष्ट्रसह अनेक प्रमुख बँकांनी उच्च व्याजदरांसह विशेष एफडी योजना सुरू केल्या आहेत. बँक ऑफ बडोदाने मान्सून धमाका एफडी योजना सुरू केली आहे. तर SBI आणि बँक ऑफ महाराष्ट्रने देखील नवीन FD स्कीम लाँच केल्या आहेत.

SBI स्पेशल FD –
स्टेट बँक ऑफ इंडियाने अमृत वृष्टी नावाची नवीन मर्यादित कालावधी ठेव योजना सुरू केली आहे. ही एक एफडी योजना आहे जी जास्त व्याज देते. अमृत ​​वृष्टी योजना सर्वसामान्य नागरिकांना ४४४ दिवसांच्या ठेवींवर ७.२५ टक्के वार्षिक व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के इतकाच व्याज मिळत आहे. ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत वैध आहे. ही नवीन योजना १५ जुलै २०२४ पासून लागू आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र स्पेशल FD –
बँक ऑफ महाराष्ट्रने वेगवेगळ्या कालावधीच्या चार एफडी योजना सुरू केल्या आहेत. बँक २०० दिवस, ४०० दिवस, ६६६ दिवस आणि ७७७ दिवसांची एफडी ऑफर करत आहे. बँक २०० दिवसांच्या ठेवींवर ६.९ टक्के, ४०० दिवसांच्या ठेवींसाठी ७.१० टक्के, ६६६ दिवसांच्या ठेवींसाठी ७.१५ टक्के आणि ७७७ दिवसांच्या ठेवींवर ७.२५ टक्के व्याजदर देत आहे.

बँक ऑफ बडोदा स्पेशल FD –
बँक ऑफ बडोदाने उच्च व्याजदरासह नवीन विशेष एफडी योजना सुरू केली आहे. नवीन एफडीला मान्सून धमाका ठेव योजना असे नाव देण्यात आले आहे. बँकेने आपल्या नियमित एफडी योजनेतही सुधारणा केली आहे. बँक ऑफ बडोदा ३३३ दिवस आणि ३९९ दिवसांची उच्च व्याजाची एफडी ऑफर करत आहे. त्याच वेळी, ३३३ दिवसांच्या FD वर ७.१५ टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना ३९९ दिवसांसाठी ७.७५ टक्के आणि वार्षिक ७.६५ टक्के दराने मिळेल. BOB Monsoon Dhamaka FD ३९९ दिवसांसाठी कमाल ७.९० टक्के वार्षिक व्याज देत आहे. ही योजना १५ जुलै २०२४ पासून सुरू झाली आहे.

Latest Posts

Don't Miss