Latest Posts

जिल्हयात १० लाख १६ हजार मतदार

– पुरुष मतदारांपेक्षा स्त्री मतदारांची संख्या जास्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत अधिक आहे. पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या अधिक असल्याचे निवडणुक आयोगाने दिलेल्या माहितीत कळविले आहे. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे.

भंडारा येथे एकूण मतदार १० लाख १६ हजार ८७० असून यामध्ये ४ तृतीयपंथींची नोंद आहे; पुरुष मतदार ५ लाख ६ हजार ९७४ आणि महिला मतदार ५ लाख ९ हजार ८९२ आहेत. विधापसभानिहाय स्त्री-पुरुष मतदारांची संख्या ६०-तुमसर मध्ये १५५४१० पुरुष तर १५४३१६ स्त्री मतदार आहेत. तृतीयपंथी मतदार १ आहेत. असे एकुण ३ लाख ९७२७ एकुण मतदार आहेत. ६१-भंडारा १८७४६२ पुरुष तर १९१२०२ स्त्री मतदार आहेत. तृतीयपंथी मतदार ३ आहेत असे एकुण ३ लाख ७८६६७ एकुण मतदार आहेत. ६२- साकोली १६४१०२ पुरुष तर १६४३७३ स्त्री मतदार आहेत. असे एकुण ३ लाख २८४७ एकुण मतदार आहेत. तीनही मतदार संघातील एकूण १० लाख १६ हजार ८७० मतदार आहेत.

Latest Posts

Don't Miss