– भारतीय जनता पार्टी चामोर्शी तालुका व शहर यांच्या वतीने गाव चलो अभियान कार्यशाळेचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी (Chandrapur) : ४ जानेवारी २०२४ रोज रविवार ला भारतीय जनता पार्टी तालुका चामोर्शी व शहर यांच्या वतीने गाव चलो अभियान कार्यशाळेचे आयोजन प्राथमिक शिक्षक पतसंस्था सभागृह चामोर्शी येथे करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन खासदार अशोक नेते हे होते. यावेळी मचांवर प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आमदार डॉ. देवराव होळी, लोकसभा विस्तारक प्रमुख बाबुराव कोहळे, किसान आघाडी मोर्चा चे प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, विधानसभा प्रमुख दामोधर अरिगेला, किसान आघाडी चे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, शहराध्यक्ष सोपान नैताम, माजी न्यायाधीश दिक्षीत, जिल्हा सचिव दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, मधूकर भांडेकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, गाव चलो अभियान हे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास अशी संकल्पना असुन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व कार्यात केंद्र शासनाच्या अनेक योजना कार्यान्वित व अंमलात आणत तळागाळातील लोकांपर्यंत कशा पोहोचाव्या यासाठी सशक्त भारत, स्वावलंबी भारत आणि विकसित भारत बनविण्याचा संकल्प असून याकरिता प्रत्येक घरा घरापर्यंत, प्रत्येक समाज घटकापर्यंत जाऊन गाव चलो हा अभियान यशस्वीपणे पार पाडत भारतीय जनता पार्टी संघटनेच्या कामाला कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे.
असे उदघाटन स्थानावरून बोलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ देशात उत्स्फूर्त वातावरण असून पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश सकारात्मक उर्जेने भरलेला आहे. आज, भारतातील सर्व विभाग आणि क्षेत्रांच्या विकासासह, भारताचा गौरव झाला आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी या गाव चलो अभियान कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक रमेश भुरसे, संचालन दिलीप चलाख, आभार मधूकर भांडेकर यांनी केले.
भाजपा संघटनेच्या कामात योगदान देणारे स्वर्गीय लक्ष्मण वासेकर व सुधाकर नाईक यांच्या आत्म्यास देव चिरशांती देवो यासाठी गाव चलो अभियान या कार्यशाळेच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला खासदार अशोक नेते यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
भाजपात माजी न्यायाधीश यांचा पक्ष प्रवेश –
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान विश्व गौरव नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली देश बनत असून आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत आहे. याच धर्तीवर विश्वासाने खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात माजी न्यायाधीश दिक्षीत साहेब यांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन पक्षात सहर्ष स्वागत केले.
जफ्फर अली शेख, गोंगलु गावडे, निर्मला गावडे, दसरी गावडे, वनिता झाडे, ललिता डोंगरे, मल्लू बाई इप्पावार, मीरा बाई बोरकर आदी उपस्थित होते.
