विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : राज युवा ग्रुप गौरक्षण वार्ड तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख विरुर स्टे. चे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकुन त्यांच्या शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासकीय घटकांच्या मदतीने एक कार्यक्षम प्रगतीशील प्रशासन स्थापन केले. त्यांनी युद्धशास्त्रात अनेक नवनवीन शोध लावले आणि गनिमी कावा युद्धाची एक नवीन शैली, शिवसूत्र विकसित केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय व्यवस्था आणि न्यायालयीन शिष्टाचाराचे पुनरुज्जीवन केले.
जयंती निमित्य राज युवा गृप गौरक्षण वार्ड बल्लारपुर तर्फे शरबत वितरण केले गेले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी साठी अध्यक्ष नीरज झाडे, अर्जुन मेश्राम,तुषार उईके, सुरज गेडाम, दीपक गगुरवार, मनोज गेडाम, पवण शेंडे, मनोज शेड, रुषी पुनेकर, सुरज चन्ने, शंकर चौधरी, मंगेश जाभुळकर, सुरज पानेम, अनिल चिंतावार, राहुल फासलावार, अमित मेश्राम, रंजित गेडाम, सचिन मेश्राम, आकाश मेश्राम, अक्षय मेश्राम, बंडु जिल्लला, अविनाश गेडाम, चंदन चौधरी, प्रशांत, पुरभ फुलझेले, शेख फेजल, शेख सोहेल, सतोश मेश्राम, विजय बोरीकर, अतुल मडामी, नानीश, सजीव गेडाम यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
